ब्लू जावा या निळ्या रंगाच्या विदेशी असून ज्याला "आईस्क्रीम केळी" म्हणूनही ओळखले जाते, ही एक दुर्मिळ आणि विदेशी प्रजाती आहे.
या केळीची लागवड मुख्यतः दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये आणि अमेरिकेतील हवाई प्रांतात केली जाते.
या केळीची झाडे 15-20 फूट उंच फुटांपर्यंत वाढतात आणि ती थंड हवामानातही तग धरू शकतात
ब्लू जावा फळ हे मध्यम आकाराचं असतं केळीच्या एका फळीत 10 ते 12 फाण्या असतात हे विदेशी वाण इतर स्थानिक वाणाप्रमाणेच दहा महिने कालावधीत काढणीला येतं
ब्लू जावा केळीचा गर मलाई सारखा असून त्याची चव आईस्क्रीम सारखी असते त्यामुळे या वाणाला आईस्क्रीम केळी असं सुद्धा म्हटलं जातं
आरोग्यदायी फायदे1.पचन सुधारते व वजन कमी करण्यास मदत करते.2.हृदयासाठी उपयुक्त; रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.3.झोपेचे विकार कमी करते आणि मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते.4.अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोगासारख्या आजारांपासून संरक्षण मिळते
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या केळीच्या लागवडीमध्ये यश मिळवले आहे. एक शेतकरी दोन एकरात 50 टन उत्पादनाची अपेक्षा करत आहे, ज्यामुळे त्याला चांगला आर्थिक फायदा होईल