Nimboli extract details: कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले ‘अझाडिरेक्टीन’ हा रासायनिक घटक कीटकनाशकाचे काम करतो. या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते, तर ते पानांमध्ये कमी प्रमाणात असते. ‘अझाडिरेक्टीन’ हा घटक किटक, सुत्रकृमी, विषाणू आणि बुरशी यांचे नियंत्रण करण्यासाठी उपयोग होतो. हे फक्त चाऊन खाणारे व रस शोषणाऱ्या किडींवर परिणाम करते. फवारणीसाठी नैसर्गिक घटकांचा अर्क हा ५% पर्यंत काढला जातो. निंबोळी अर्काचा वापर कमी खर्चाचा, सोपा आणि तुलनात्मक विचार केल्यास प्रभावी असा उपाय आहे. रासायनिक किटकनाशकाएवढा जरी तो किडी विरुद्ध प्रभावी नसला तरी, त्यातील नैसर्गिक रसायनामुळे पिकाचे आणि परोपजीवी किटकांचे नुकसान होत नाही. त्यामुळे जैविक नियंत्रणासाठी परोपजीवी किटकांचे एक प्रकारे संवर्धन होते. याशिवाय आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना निंबोळीचा वापर किफायतशीर ठरतो.
५% निंबोळी अर्क बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
- कडुलिंबाच्या पूर्णपणे सुकलेल्या निंबोळी ५ किलो
- चांगले व स्वच्छ पाणी १०० लिटर
- साबणाचा चुरा किंवा कपडे धुण्याची पावडर २०० ग्रॅम
- गाळण्यासाठी कापड
⚡ ५% निंबोळी अर्क तयार करण्यासाठी :
- पावसाच्या सुरुवातीच्या काळात निंबोळी जमा करून ठेवाव्यात किंवा बाजारातही आपल्याला निंबोळी मिळतात.
- जमा केलेल्या निंबोळी व्यवस्थित साफ करुन त्या व्यवस्थित वाळवून घ्याव्यात आणि त्यानंतर व्यवस्थित साठवून ठेवाव्यात.
- फवारणीच्या आदल्या दिवशी ५ किलो निंबोळ्या कुटून किंवा दळून बारीक करावी.
■ ही बारीक केलेली भुकटी ९ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे.
■ याचबरोबर १ लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा किंवा कपड़े धुण्याची पावडर वेगळी भिजत घालावी, तयार होणारा निंबोळी अर्क पानावर योग्य रीतीने पसरावा व टिकून राहावा यासाठी याचा उपयोग होईल.
- दुसऱ्या दिवशी सकाळी लाकडी काठीने है द्रावण दूधासारखे दिसेपर्यंत ढवळावे
- द्रावण ढवळून झाल्यावर निंबोळी अर्क स्वच्छ फडक्यातून गाळून घ्या. यासाठी कपड्याची पुरचुंडी चांगली पिळून घ्या, जेणे करून जास्तीत जास्त अर्क निघेल.
■ या अर्कात १ लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे व हे मिश्रण चांगले ढवळावे, हा सर्व अर्क १०० लिटर होईल एवढे पाणी टाकावे.
Nimboli extract details
अशाप्रकारे निंबोळीचा ५% अर्क तयार होईल. सूचना:
■ निंबोळी गोळा करताना व्यवस्थित साफ करून त्या सावलीत वाळवून पुढील वापरासाठी साठवून ठेवाव्यात. • आठ महिन्यांपेक्षा जुन्या निंबोळ्या वापरू नका कारण इतक्या जुन्या बियांमध्ये जरूर ती कीडनाशक शक्ती राहात नाही.
नेहमी निंबोळीचा ताजा अर्क वापरा ⚡फवारणीची वेळ :
Nimboli extract details: निंबोळीच्या अर्काची फवारणी संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दुपारी ३.३०- ४.०० नंतर करणे योग्य असते. हा तयार केलेला फवारा झाडावर कुठेही पडला तरी तो आंतरप्रवाही असल्यामुळे पूर्ण झाडात पोहोचतो.
⚡ निंबोळी अर्काचे फायदे:
• निंबोळी अर्काचा वापर भाजीपाला पिके, तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये, कपाशी अशा सर्व प्रकारच्या पिकांमध्ये कीडनाशक म्हणून केला जातो.
• निंबोळी अर्क किटकांवर बहुआयामी आंतरप्रवाही किटकनाशकाप्रमाणे कार्य करतो. • निंबोळी अर्कामुळे किडींच्या जीवनचक्रामध्ये पतमवर्गीय किर्डीना अंडी घालण्यापासून परावृत्त केले जाते तसेच रस शोषक किडींचे देखील अंडी घालण्याच्या नैसर्गिक क्रियेमध्ये अडथळा येतो.
• कडुलिंबातील ‘अझाडीरेक्टीन’ हा घटक किडीची वाढ थांबवतो, कात टाकण्यास प्रतिबंध करतो. त्यामुळे कीड गुदमरून मरण पावते.
• निंबोळी अर्क पिकांवर फवारणीसाठी वापरला असता विविध प्रकारच्या किडीस खाद्य प्रतिबंध करतो. उदा. पांढरी माशी, घरमाशी, मिलीबग, लष्करी अळी, तुडतुडे, फुलकिडे, उंटअळी इत्यादी.
■ निंबोळी अर्कासोबत बोंडअळीच्या नियंत्रणाकरिता शिफारस केलेल्या किटकनाशकांची अर्धी मात्रा मिसळल्यास त्यांचे नियंत्रण अधिक चांगल्या प्रकारे होते.
■ गाळून काढलेली निंबोळी भुकटी झाडाला खत म्हणून वापरता येते. म्हणून कीटकांचा प्रादुर्भाव दिसताच, पिक संरक्षणाकरिता वरील पद्धतीने तयार केलेल्या निंबोळी अर्काची ५% प्रति हेक्टर प्रमाणे फवारणी घ्यावी.
डॉ. प्रमोद सिनगारे, सहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, राजीव गांधी कृषी महाविद्यालय, परभणी श्री. सुमित सुर्यवंशी, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, परभणी
शेतीविषयक अधिक माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृषी यशोगाथा: शेतीतून करोडपती होण्याची संधी ! या तरुण शेतकऱ्याने दाखवला नवा मार्ग
कृषी माहिती: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! आंब्याच्या ‘या’ 11 जातींमधून लाखोंचा नफा
कृषी यशोगाथा: नैसर्गिक शेतीबद्दल कृषी सदस्यांकडून प्रशिक्षण
कृषी यशोगाथा: स्ट्रॉबेरीच्या शेतीमुळे नशीब बदलले, केवळ 5 महिन्यांत कमावले 9 लाख