सोयाबीनमध्ये ओलाव्याची समस्या जाणवत आहे का? ‘या’ 5 उपायांचा अवलंब करा!

सोयाबीनची लागवड करणारे शेतकरी सध्या सोयाबीनमधील ओलाव्याच्या समस्येने चिंतेत आहेत. ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीनला बाजारात योग्य भाव मिळत नाही.

सोयाबीनमधील ओलाव्याच्या समस्येवर मात करण्यासाठी जाणून घेऊ या पद्धती आणि उपायांबद्दल.

फॅन वापरून सोयाबीन सुकवा: तुम्ही तुमचे सोयाबीनचे उत्पादन पेडेस्टल फॅन्सने सुकवू शकता. यामध्ये दर एक किंवा दोन दिवसांनी सोयाबीनमधील आर्द्रता तपासावी आणि त्यानुसार पंख्याचा वेग वाढवा किंवा कमी करावा.

सोयाबीन कमी तापमानात ग्रेन स्प्रेडरने वाळविणे: सोयाबीन पीक सुकविण्यासाठी ग्रेन स्प्रेडरचा वापर केला जाऊ शकतो. त्यावर तुम्ही सोयाबीन पसरवू शकता.  या तंत्रात सोयाबीनचे उत्पादन कमी तापमानात वाळवता येते

सोयाबीन सुकविण्यासाठी ड्रायर वापर: बाजारात अनेक प्रकारचे ड्रायर मशीन उपलब्ध आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे सोयाबीन सुकवू शकता

सोयाबीन ओलसर ठिकाणी ठेवणे टाळा: सोयाबीन ओलसर ठिकाणी ठेवणे टाळावे. ओलसर जागी सोयाबीन साठविल्यास ओलावा आणि ओलसरपणा येतो आणि जास्त ओलाव्यामुळे सोयाबीनला बुरशी येऊ शकते आणि सोयाबीनचे पीक खराब होऊ शकते.

सोयाबीन सुकविण्यासाठी आगीचा वापर करू नका: सोयाबीनचे उत्पादन सुकविण्यासाठी आग किंवा उष्णतेचा कधीही वापर करू नये. यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.जळण्याचा धोका असतो.

अश्या पद्धतीने तम्ही सोयाबीनमधील ओलाव्याच्या समस्येवर मात करू शकता