1 मे पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागेल?

RBI ने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, 1 मे 2025 पासून खालील शुल्क लागू होतील

· कॅश विथड्रॉल चे फ्री लिमिट संपल्यानंतर प्रत्येक आर्थिक लेनदेनासाठी  ₹19 चार्ज लागणार  (पूर्वी ₹17)

बॅलन्स इंक्वायरी करताना प्रत्येक नॉन-फायनान्शियल ट्रांजॅक्शनवर ₹7 शुल्क (पूर्वी ₹6)

इतर सेवा: मिनी स्टेटमेंट, पिन बदल यांसारख्या सेवांवरही शुल्क वाढू शकते.

मेट्रो शहरांमध्ये (मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद): दरमहा ५ मोफत लेनदेन (स्वत:च्या बँकेतर्फे नसलेल्या ATM वरून)

· नॉन–मेट्रो शहरं आणि ग्रामीण भागात: दरमहा ३ मोफत लेनदेन. या मर्यादा ओलांडल्यास प्रत्येक लेनदेनासाठी वर नमूद केलेले शुल्क आकारले जातात.

उदाहरण: जर कोणी मुंबईमध्ये राहत असेल आणि ६व्या वेळी दुसऱ्या बँकेच्या ATM वरून पैसे काढले, तर त्यावर ₹19 शुल्क + GST लागेल.

हे शुल्क टाळण्याचे असेल तर ग्राहकांसाठी सल्ला आणि उपाय

1. स्वत:च्या बँकेचे ATM वापरा: होम बँक ATM वरून कॅश काढल्यास अतिरिक्त शुल्क टाळता येते. 2. मोबाइल/इंटरनेट बँकिंग: UPI (PhonePe, Google Pay), AEPS (Aadhaar Enabled Payment System) द्वारे पैसे ट्रान्सफर करा. 3. फ्री लिमिटचा स्मार्ट वापर: मेट्रोमध्ये ५ आणि ग्रामीण भागात ३ मोफत लेनदेन याचा विचारपूर्वक वापर करा. 4. मिनी स्टेटमेंटसाठी ऑनलाइन पर्याय: SMS बँकिंग किंवा बँकिंग ऍप्सवर बॅलन्स चेक करा.