उन्हाळी भेंडीची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी
एक हेक्टर पेरणीसाठी १२ ते १५ किलो बियाणे पुरेसे होते. लागवडीचे अंतर ३०x१५ सें.मी. असून लागवडीपूर्वी बियाण्यास प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
अॅझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जिवाणू प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे.
रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड ४८ टक्के एफ.एस. ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे.
पिकाच्या जोमदार वाढीसाठी खतांचा समतोल पुरवठा करणे गरजेचे आहे
पिकामध्ये उर्वरित अंश तपासणीमध्ये हानिकारक घटकांची मात्रा कमी येण्याकरिता सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे
पूर्वमशागत करताना हेक्टरी २० टन १) शेणखत द्यावे. रासायनिक खतांद्वारे १००:५०:५० नत्र, स्फुरद व पालाश किलो प्रति हेक्टर द्यावे. उरलेले अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी करताना द्यावे.
उरलेले अर्धे नत्र तीन समान हप्त्यात ३०, ४५ व ६० दिवसांनी द्यावे.
जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास पेरणी करताना फेरस सल्फेट व झिंक सल्फेट प्रत्येकी २० किलो प्रति हेक्टर जमिनीतून द्यावे किंवा पेरणीनंतर ३० ते ४५ दिवसांनी फेरस सल्फेट ०.५ टक्के व बोरिक अॅसिड ०.२ टक्के ची फवारणी करावी.