जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी उपाय

सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारतात.

सेंद्रिय खत निर्मितीसाठी जास्त पाऊस असलेल्या भागात जमिनीवर ढीग पद्धत आणि कमी पावसाळी भागात खड्डा पद्धत वापरावी.

शेतात शक्य तेव्हा हिरवळीची पिके (धैंचा, ताग) यांची लागवड व गाडण्याच्या प्रक्रियेतून जमिनीतील सेंद्रिय घटक वाढवावेत.

पिकांचे अवशेष, बिया नसलेल्या तणे यांचा वापर पिकामध्ये आच्छादनासाठी करावा.

वायोचार शेणखतासोबत १:२ प्रमाणात मुरवून जमिनीत मिसळावा. म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढेल

जमिनीची सतत नांगरट टाळावी. कमी किंवा शून्य मशागत तंत्राकडे वाटचाल केल्यास जमिनीच्या संरचनेत सुधारणा होते

रिमोट सेन्सिंगद्वारे सेंद्रिय कर्बाचे निरीक्षण करत राहावे

नॅनो-सुधारक व खते सेंद्रिय पदार्थांची कार्यक्षमता वाढवतात. त्याचा वापर करावा.

स्फुरदयुक्त सेंद्रिय खते (प्रोम खते) वापरून कर्ब व पोषणतत्त्वे सुधारावीत.